महाराष्ट्रात गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले : संजीव कुमार सिंघल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा प्रमाण वाढत आहे. २०१३ -१४ नंतर आरोपींना पुराव्याच्या आधारे शिक्षा मिळाली आहे. महाराष्ट्रात आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा देण्याचा प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सुरक्षा व्यवस्था आणि गुन्ह्यांची उकल करण्याचे काम पोलिसांचे आहे. गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली तर त्यांच्या मनामध्ये पोलिसांची भिती बसेल, असे मत अतिरिक्त पोलीस महासंचालक संजिव कुमार सिंघल यांनी व्यक्त केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b76eea1-c17a-11e8-bb9c-07f0e4b71312′]

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.  मे -२०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये राज्यातील ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसाकरीता  निवड झालेल्या ११ गुन्ह्यांमधील एकूण ४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त पोलीस महासंचालक संजिव कुमार सिंघल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. मोक्का अंतर्गत शिक्षा झालेले गुन्हेगार, नयना पुजारी खुन प्रकरण, औरंगाबादमध्ये अहमदाबाद बॉम्ब स्फोटातील आरोपींना अटक, नरबळी गुन्ह्यात ७ वर्षाच्या मुलाचे अपहरण खून करणाऱ्या आरोपींना अटक अशा गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

ब्लॅकमेल करुन ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह’चा खून 

या कार्य़क्रमाला विशेष महानिरीक्षक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, डॉ. जय जाधव, पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3493751b-c17a-11e8-bc47-47c958a45116′]

पुरस्कार मिळालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे

– नागपुर परिक्षेत्रातील रामनगर पुलोसी ठाण्यात मे २०१७ च्या दरम्यान गुन्ह्याचा योग्य तापास करुन गुन्हा उघडीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक एम.डी. शरणागत, पोलीस उप निरीक्षक राधेश्याम रामायण पाल, पोलीस हवालदार सुरेश केमेकर आणि राजू मेश्राम यांना सन्मानीत करण्यात आले.

– पुणे शहर पोलीस दलातील येरवडा पोलीस ठाण्यात जून -२०१७ मधील नयना पुजारी केसचा तपास योग्य पद्धतीने केल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिपक सावंत, पोलीस हवालदार प्रकाश केशव लंघे, पोलीस नाईक सचिन कदम आणि पोलीस नाईक प्रदिप शेलार यांचा सन्मान करण्यात आला.

– औरांगाबाद परिक्षेत्रातील बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यातील जून २०१७ मध्ये केलेल्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल पोलीस उप अधीक्षक ज्योती क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला.

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3eb39ee7-c17a-11e8-94ba-57b7c30439dd’]

– नांदेड परिक्षेत्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपुर पोलीस ठाण्यातील जून २०१७ मधील खुनाच्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे, पोलीस हवालदार ए.जी. इनामदार, पोलीस नाईक एस.जी. राठोड यांना सन्मानीत करण्यात आले.

– अमरावीती परीक्षेत्रातील यमवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०१७ मध्ये जादुटोणा गुन्ह्यामध्ये योग्य तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक चंदनसिंह बायस, सहायक पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सहायक फौजदार अकील देशमुख, पोलीस हवालदार अरुण नागतोडे, गजानन अजमिरे आणि पोलीस शिपाई आशिष भुसारी यांना सन्मानीत करण्यात आले.

– पुणे पोलीस दलातील हडपसर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन खून केल्याचा तपास योग्य पद्धतीने केल्याबद्दल पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस हवालदार एस.जी. भगत आणि महिला पोलीस शिपाई वी.एस. वेदपाठक यांचा सन्मान करण्यात आला.

[amazon_link asins=’B00NQ2RULQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d55a012-c17a-11e8-8b4c-a10a57d3e1ac’]

पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचाच 

– पुणे शहर पोलीस दलातील येरवडा पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल पोलीस निरीक्षक संजय पाटील, विलास लोंडे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पुलीस हवालदार राजाराम घोगरे, पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना सन्मानीत करण्यात आले.

– पुणे शहर पोलीस दलातील समर्थ पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस निरीक्षक रविंद्र बाबर यांना सन्मानीत करण्यात आले.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6dd1638e-c17a-11e8-ba43-8966c8ac39b3′]