चक्क सरकारकडे मागितला चोरी करण्याचा परवाना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन

सरकार दरबारी विविध प्रकारचे परवाने, परवानग्या, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही लोक वेग-वेगळी शक्कल लढवतात. असे अनेक प्रसंग तुम्ही पाहिले असतील किंवा ऐकले असली. परंतु चोरीचा परवाना मागितल्याचे आपण कधी ऐकले आहे का? नाही ना… पण असे झाले आहे. कारण एका व्यक्तीने भारतीय संविधानाने आपल्या अधिकार व स्वातंत्र्य दिल्याचा संदर्भ देत चक्क चोरी करण्याचा परवाना मागितला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e075e7a9-8209-11e8-b09d-03f601b10db2′]

हा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आहे. प्रकाश बिरोराम बनसोडे यांनी मुखेडचे तहसिलदारांना निवदेन दिले आहे. यामध्ये त्यांनी सरकारकडे चोरी करण्याचा परवाना देण्याची विनंती केली आहे.  त्यांच्या म्हणण्यानुसार परवाना मागण्याचा अधिकार त्यांना भारतीय राज्य घटनेने दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९ अ नुसार व्यक्ती स्वातंत्र्य मिळण्याचाही अधिकार आहे. आणि त्याचप्रमाणे मला चोरी करण्यासाठी सरकारकडून परवाना किंवा परवानगी मिळाली पाहिजे. हे वाचल्यानंतर आपल्यालाही धक्का बसला असेलच, मग हे निवेदन स्विकारणाऱ्या तहसीलदार साहेबांची काय अवस्था झाली असेल…

प्रकाश बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी गरीब व्यक्ती असून माझी परिस्थीती हालाकीची आहे. माझ्या कुटुंबातील मुले कमविणारे नाहीत. तसेच माझ्याकडून कोणतेही अवजड काम होत नसल्याने माझी आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. कोणतेही शासकिय किंवा निमशासकिय काम करावयाचे असेल तर पैसे लागतात. पण कामाच्या किंमतीपेक्षा तीन ते चार पट पैसे येथील यंत्रणांना द्यावे लागतात. आणि ती रक्कम देण्याची माझी कुवत नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पालपोषण करण्यासाठी चोरी करण्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही. यासाठी सरकारने चोरी करण्याचा परवाना, परवानगी देण्याची विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बनसोडे यांनी या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, नांदेडचे जिल्हाधिकारी आणि मुखेडचे आमदार यांना पाठवली आहे.