लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा विचार नाही; राज्य शासनाचे स्पष्टीकरण

मुंबईः पोलीसनामा आॅनलाइन
अनेक दिवसापासून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र्य धर्म नसून तो हिंदू धर्मातीलच एक पंथ असल्याने त्याला स्वतंत्र्य धर्माचा दर्जा देण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य शासनाने गुरूवारी स्पष्ट केले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र्य धर्म तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा याबाबत गुरूवारी विधानसभेत लेखी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी सरकरची भूमिका स्पष्ट केली.
[amazon_link asins=’B07D3WF464′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’433977c0-8677-11e8-9907-0f3f18303993′]
लिंगायत रसमाजातील एका गटाकडून समाजाला स्वतंत्र्य धर्माच दर्जा दिला जावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी राज्यात अनेकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर कर्नाचकमध्ये हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील काॅंग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र्य धर्माचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. याचाच दाखला देत महाराष्ट्रातील मोठी संख्या असणाऱ्या समाजाने स्वतंत्र्य धर्माची मागणी केली आहे. मात्र या मागणील समाजातील दुसऱ्या गटाकडून मागणी आहे.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’539f02cb-8677-11e8-9987-abfb62271a0d’]
पहा नेमकं तावडे या प्रश्नाला उत्तर देताना काय म्हणालेः
वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे २०१४ मध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने सांगितले होते. त्यामुळेच २०११ रोजी झालेल्या जणगणनेतही या समाजाची स्वतंत्र नोंद करण्यात आली नाही. याचा दाखला देताना स्वतंत्र धर्माच्या प्रस्तावानुसार, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नसल्याचे तावडे म्हणाले आहेत.