‘हा’ आहे इंग्रजीतील सर्वात ‘लांब’लचक शब्द, जो वाचण्यासाठी लागू शकतो अनेक तासांचा ‘वेळ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोकांना झेकोस्लॉवियासारखे इंग्रजी शब्द वाचताना अडचण येते, तर इंग्रजीत एक शब्द असाही आहे, ज्याचा उच्चार करण्यासाठी तुम्ही बसलात तर साडेतीन तास लागू शकतात. आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता शब्द आहे, जो वाचण्यासाठी एवढा वेळ लागतो, तर जाणून घेवूयात या शब्दाबद्दल…

तुम्हाल जाणून आश्चर्य वाटेल की इंग्रजीत सर्वात लांबलचक शब्दात 1,89,819 अक्षरे आहेत आणि तुम्हाला त्याचा उच्चार करण्यासाठी साडेतीन तास लागतील. हा शब्द माणसाच्या शरीरात आढणार्‍या टिटीन नावाच्या एका प्रोटीचे रासायनिक नाव आहे. शास्त्रज्ञांनुसार, मानवी शरीरात 20 लाखांपेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत, जे अमीनो अ‍ॅसिडने तयार होतात. माणसाच्या शरीरातील टिटान हे आतापर्यंतचे ज्ञात सर्वात लांब प्रोटीन आहे, ज्यामध्ये 26 हजारपेक्षा ज्यास अमिनो अ‍ॅसिड असतात.

अगोदर टिटीनच्या रासायनिक नावाला इंग्रजी शब्दकोषात ठेवण्यात आले होते, परंतु जेव्हा या नावाच्या लांबीवरून अडचण होऊ लागली तेव्हा त्यास शब्दकोषातूनच काढण्यात आले. आता त्यास केवळ टिटीन नावानेच ओळखले जाते. टिटीन प्रोटीनचा शोध रेझी नटोरी यांनी 1954 मध्ये लावला. यानंतर 1977 मध्ये कोस्सक मरूयामा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्यावर आणखी संशोधन केले आणि या प्रोटीनचे नाव कोन्नेक्टिन ठेवले. यानंतर दोन वर्षांनी कुआन वांग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुद्धा यावर संशोधन केले आणि त्याचे नाव टिटीन ठेवले.