चाकण जाळपोळ : दहा कोटी रुपयांचे नुकसान

चाकण : पोलिसनामा ऑनलाईन

खेड तालुका सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या रास्ता रोको व बंद नंतर काही समाजकंटकांनी गोधळ घालत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. यामध्ये प्रामुख्याने सरकारी वाहने, पोलीस ठाणे, चौकी, पत्रकार, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लक्ष्य करत हल्ला करण्यात आला. दंगल व जाळपोळीच्या घटनेत आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती चाकण सज्जा चे मंडलाधिकारी बाळकृष्ण साळुंके यांनी दिली.
[amazon_link asins=’B07D9RCKDR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa16aa37-94ba-11e8-89e0-01d59b63e03d’]
सकल मराठा आरक्षणाबाबत व मागण्या संदर्भात केलेल्या रास्ता रोको दरम्यान अंदाजे अनोळखी चार ते पाच हजार लोकांनी केलेल्या हिंसाचारामध्ये ३५ चारचाकी शासकीय व खाजगी वाहनांबरोबर दोन चाकी ,तीन चाकी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करून अंदाजे ८ ते १० कोटी रुपयांची वित्तहानी केली. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस कर्मचारी अजय भापकर यांचेवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याबाबतची फिर्याद चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी दिली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चार ते पाच हजार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.

काल झालेल्या मारहाण, दंगल, जाळपोळ झालेल्या घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी दिल्या असून पोलीस पथकाने घटना घडलेल्या ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते हे स्वतः उपस्थित राहून या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज चाकण मधील वाहतूक सुरळीत झाली असून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौक, नगर परिषद समोर पोलिसांच्या एकूण २५ व्हॅन व राज्य राखीव दलाचे ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. घटना स्थळाचे पंचनामे सुरू असून महामार्गावर जळलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आली आहेत.