…अन् वाहतूक पोलिसांमुळेच हरवलेला मोबाईल मिळाला

पुणे : वाहतूक पोलीस फक्त दंड आकारत नाहीत, कागदपत्र तपासत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. रस्त्यात एखाद्याची वस्तू सापडली, तर ती संबंधितांपर्यंत सुखरूप पोहोचवितात. रविवारी (दि. 21) फातिमानगर चौकात दुचाकीचालकाला मोबाईल वानवडी वाहतूक पोलीस शिपाई अश्विनी तिडके यांना सापडला. तिकडे यांनी खातरजमा करून त्यांना परत केला. वाहतूक पोलिसांमुळेच माझा हरवलेला मोबाईल मिळाला, असे अमोल ताटे यांनी सांगितले.

अमोल ताटे (वय 33, रा. रामोशी आळी, हडपसर) यांचा मोबाईल फातिमानगर चौकातून सोपानबागेकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या खिशातून महागडा मोबाईल पडला. घरी गेल्यानंतर मोबाईल हरवल्याचे लक्षात आले. महागडा मोबाईल हरवल्याने त्यांच्या घालमेल सुरू झाली. त्यांच्या पत्नीने काय झाले असता विचारल्यावर मोबाईल हरवल्याचे समजले. तातडीने मोबाईल फोन केला, तर मोबाईल वाहतूक पोलीस शिपाई अश्विनी तिकडे यांच्याकडे सुरक्षित असल्याचे समजले. ताटे यांनी तातडीने फातिमानगर चौकात जाऊन तिकडे यांच्याकडून मोबाईल घेऊन आभार मानले. यावेळी ताटे म्हणाले की, चौकात वाहतूक पोलिसांमुळे मला माझा महागडा मोबाईल मिळाला. वाहतूक पोलीस फक्त दंड आकारत नाहीत, कागदपत्र तपासत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे देऊन मदत करतात. रस्त्यात एखाद्याची वस्तू सापडली, तर ती संबंधितांपर्यंत सुखरूप पोहोचवितात, याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले.