मोहाडी पोलीसांनी पकडला लाखोंचा गांजा २ जण गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – गांजा (मादक पदार्थ) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाचे स्वतः चे आर्थिक फायदेसाठी घरात लपवून ठेवल्या प्रकरणी सागर अमृत चौगुले. वय-२८, कालुचरण कोडुचरण बेहरा,वय-५०.घर नंबर ३२१. मोहाडी उपनगर दडेवाला बाबा नगरातून मोहाडी पोलीसांनी दोघे आरोपींनी मुद्देमालसह ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.

सविस्तर माहिती की, मोहाडी उपनगरातील स्वतःचे घरात दोन मजूरांनी लपवून ठेवला आहे. एक व्यक्ती ओरीसाहुन गांजा विक्री करण्यासाठी मोहाडीउपनगरात येत आहे. हि माहिती मोहाडी पो.नि.अभिषेक पाटील यांना खबरी कडून मिळाली त्या एक पथक तयार करुन तातडीने एक पथक दंडेवाला बाबा नगरात पोहचले. एक व्यक्ती संशयित रित्या फिरताना दिसताच पाठलाग करुन पकडले. एक अन्य व्यक्तीला दंडेवाला बाबा नगरातून पकडले. एक जण फरार आहे. दंडेवाला बाबा नगरात पकडलेल्या मजुराच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याचे घरात १०० किलो गांज ( मादक पदार्थ ) स्वतःचे आर्थिक फायदासाठी घरात दडवून ठेवला होता. अन्य माल प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवलेला सगळा माल मोहाडी पोलीसांनी जप्त केला आहे. या मालाची किंमत अंदाजे ५ लाख ५०० रुपये आहे.