Coronavirus : राज्यात 3 महिन्यात पहिल्यांदाच COVID रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सर्वात कमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. देशातील स्थिती पाहता मागील 6 महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा आहोरात्र काम करत आहे. या मेहनतीला आता यश येत असल्याचे दिसत आहे. कारण मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे आढळले आहे. सोमवारी रुग्णांच्या मृत्यूसंख्येत मोठी घट झाली आहे. काल 165 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून ही संख्या 300 ते 400 च्या दरम्यान होती.

काल दिवसभरात 15,656 रुग्णांना डिस्चार्ज दिला, यामुळे अशा लोकांची आतापर्यंतची एकुण संख्या वाढून 12, 81, 896 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.49 टक्के तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे. काल दिवसभरात राज्यात 70089 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या 2 लाख 12 हजार 439 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी
पुणे शहरात सोमवारी मागील 4 महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ नोंदली गेली. शहरात 351 नवी प्रकरणे आली तर 950 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरत आहे. ही बाब दिलासादायक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पुणे शहरात सध्या 12 हजार 285 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असेन सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 856 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत सापडलेल्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1,54581 झाली आहे. येथे आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 452 रूग्ण बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 1,08,334 जणांचा मृत्यू झाल्याचे भारत सरकारने रविवारी जाहीर केले होते. दर 100 कोरोनाबाधितांपैकी मरण पावलेल्यांची सरासरी ही एवढा खंडप्राय देश असून आणि दोन नंबरची लोकसंख्या असूनही खूप कमी असल्याचे म्हटले जात आहे.