‘या’ महाशयांनी केला अ‍ॅन्टी करप्शनच्या कर्मचा-यावर गोळीबार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – पैसे घेताना पकडताच पोलीस अधिका-याचा ACB कर्मचा-यावर गोळीबार केल्याची घटना बुधावारी (दि.१२) अकोला येथे घडली. लोकांचे रक्षण करणा-या पोलीस अधिका-यानेच अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कर्मचा-यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आह. जखमी कर्मचा-यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकार
अकोला येथील पिंजर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात आपण अडकलो असल्याची जाणीव होताच नागलकर यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून पथकाच्या कर्मचा-यावर गोळीबार केला. या घटनेत एसीबीचे कर्मचारी सचिन धात्रक हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस निरीक्षकाची वदग्रस्त कारकीर्द
पिंजर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नागलकर हे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्यावर वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होणार होती.

कारवाई होणार असल्याची चिन्ह दिसताच नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचा-यावर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळी झाडली. यामध्ये सचिन धात्रक हे गंभीर जखमी झाले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

टीबीग्रस्त बाळाची घ्या काळजी ; ‘हे’ उपचार करणे आवश्यक 

थायरॉइडच्या आजारात आराम मिळण्यासाठी करा ‘ही’ आसने

सावधान ! अंधूक प्रकाशात वाचन करताय ? करावा लागेल या समस्यांचा सामना 

उपवासाने कमी होईल ‘लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like