मॉलच्या मॅनेजरला खंडणी मागणाऱ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – औंधमधील रिलायन्स फ्रेश मॉलमधून तेल, तांदूळ, साबण, चोरून नेल्याने कामावारून काढल्यानंतर साथीदारांसोबत मिळून व्यवस्थापकाला खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.

आशिष योहान साळवी (२९, दापोडी), अमर शिवाजी अडसूळ (३०, फुगेवाडी), एवीन राजन जेम्स (२७, पिंपळे गुरव), सुमीत ब्रम्हानंद गरुड (२४, पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंधमधील रिलायन्स फ्रेश मॉलमध्ये कामाला असताना आशिष साळवी हा तेल, तांदूळ, साबण चोरून नेतो म्हणून मॅनेजरने कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे तो साथादारांसह येऊन मॉलच्या मॅनेजरसह सुरक्षा रक्षकांना धमकावून निघून गेला होता. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार राजू मचे यांना माहिती मिळाली की, चौघे दापोडी येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना दापोडीत सापळा रचून अटक करण्यात आली. त्यानतंर त्यांना चतुश्रृंगी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू मचे, गणेश काळे, शंकर पाटील, दत्तात्रय फुलसुंदर यांनी केली.

You might also like