बॉलिवूड क्विन कंगनाचा ‘तनू वेड्स मनू’-३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कंगना राणौत आणि आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही लवकरच येणार आहे. २०११ साली आलेला ‘तनू वेड्स मनू’ आणि २०१५ मध्येआलेला ‘तनू वेड्स मनू रिटर्न’  हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.आता याचा तिसरा भागही येणार असल्याची खुशखबर कंगनानं स्वतः दिली आहे. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘तनू वेड्स मनू ३’ ची औपचारिक घोषणा करण्यात येईल असं कंगनानं सांगितलं आहे.

कंगना सध्या  ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी ‘ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त  आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे. या चित्रपटात कंगनाने  अभिनयाबरोबरच कंगनानं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. ‘मणिकर्णिका’च्या प्रमोशनदरम्याच  कंगनाने  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘तनू वेड्स मनू ३’ येणार असल्याची माहिती दिली आहे. दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील असंही कंगना म्हणाली. लवकरच तिसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होईल अशीही माहिती कंगनाने  दिली.

‘मणिकर्णिका’चित्रपटाशिवाय कंगनाचे यावर्षी  ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच लवकरच रिलीज होणाऱ्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाकडून कंगनाला आणि चित्रपटाच्या टिमला खूप अपेक्षा आहेत.