डासांचा त्रास होतोय ? ‘या’ ७ वनस्पती घराभोवती लावा, घराचं सौदर्य वाढेल आणि डासांपासून मिळेल मुक्ती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. प्रत्येकाला डासांचा खुप त्रास होतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या जिवघेण्या आजारांनाही आमंत्रण मिळते. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी उपाय केले पाहिजेत. नैसर्गिकरित्या डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बागेत ‘मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स’ लावा. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा परिवार जिवघेण्या आजारांपासून दूर राहिल.

अनेकांना वाटते की,  घराभोवती असलेल्या झाडा-झुडपांमुळे डासांचे प्रमाण वाढते, तर हा तुमचा गैरसमज आहे. घराभोवती योग्य झाडे लावल्यास डासांपासुन तुमचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होईल. ही मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स केवळ डासांपासून सुटका करत नाही तर घराचं सौंदर्य देखील वाढवतात.

नैसर्गिकरित्या डासांपासून रक्षण करणाऱ्या वनस्पती (मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स) खालीलप्रमाणे आहेत-

1) तुळस

2) झेंडू –

3) लव्हेंडर –

Image result for लवॠहेंडर ,

4) पेपरमिंट

Image result for पेपरमींट

5) रोजमेरी

image.png

6) पुदिना –

7) गवती चहा

डासांना पळवून लावण्यासाठी  घरगुती उपाय

1 ) लव्हेंडरचा सुगंध खूप उग्र असतो त्यामुळे डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून तुम्हाला जर ही वनस्पती रोपण करणे शक्य नसेल तर घरात लव्हेंडर पासून बनवलेला रुम फ्रेशनर वापरा.

2) लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा. त्यामुळे डास जवळ येत नाही.

3) खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. असे केल्याने डास तुमच्यापासून लांबच राहतात.

4) घरातील दारं-खिडक्या बंद करून कापुर जाळा व त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू द्या.

Visit : Policenama.com