२०११ पासून फरार असलेला लष्कर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २०११ पासून फरार असलेल्या एकाला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. शफिक रफिक शेख (नानापेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर पोलिसांकडून पोलीस ठाणे स्तरावरील फरार आरोपी तपासणे व त्यांना अटक करण्यासाठी परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त यांनी पथके निर्माण केली आहेत. या पथकातील पोलीस हवालदार शितोळे हे पाहिजे आरोपी चेक करत असताना.

त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकऱणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी शफिक शेख हा नाना पेठ येथे एका गॅरेजमध्ये काम करत आहे. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खात्री करून त्याला तेथे जाऊन गुरुवारी रात्री अटक केली.  तो २०११ पासून फरार होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आय़ुक्त डॉ. प्रीती टिपरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) माया देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गज्जेवार, कर्मचारी थिकोळे, शितोळे, हुवाळे, भोसले यांच्या पथकाने केली.