आम्ही ‘ते’ सरकार स्थापन करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांनी केलं ‘स्पष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आज दुपारी राज्यपाल यांची भेट घेत असलो तरी त्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार नाही. तसेच अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, असा मोठा खुलासा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा डेडलॉक अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी अजून गोड बातमी आपल्याकडे नाही असे त्यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज दुपारी २ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता मुनगंटीवार यांनी अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही असे सांगून त्यांनी शिवसेनेला एक मेसेज दिला आहे.

स्थिर सरकार बसविण्याच्या दृष्टीने भाजपाने आजपर्यंत वाट पाहिली. देवेंद्र फडणवीस यांना ते शिवसैनिक समजतात, तर मग त्यांना विरोध करु नये. देवेंद्र यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होत आहे, त्यामुळे त्यांना विरोध नको असे मुनगंटीवार यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी हे राज्यात परत येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीपूर्वी हे विधान करुन शिवसेनेने एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे.

Visit : Policenama.com