‘भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळूनही महाराष्ट्रातली सत्ता हातातून गेल्याने भाजपला विरोधी बाकड्यावर बसावे लागले आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे भाजपातील अंतर्गत नाराजीचे प्रमाण वाढले आहे.

भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही असा आरोप शिवसेनेने केला होता. तर भाजपने असं आश्वासन कधीच दिलं नव्हतं असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनीही केला होता. त्यामुळे खरं कोण बोलतंय असा प्रश्न विचारला जातोय. मात्र भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका करत भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

‘शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र आणि विश्वसनीय मित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र होतो. शिवसेना भाजपपासून दुरावणं हे योग्य झालं नाही. राजकारणापलीकडे जात मैत्री टिकवून ठेवण्यासाठी भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद न देणं ही चूकच होती असं सुब्रम्हण्यम स्वामी यांनी स्पष्टपणे कबूल केलं.

दरम्यान, सुब्रम्हण्यम स्वामी हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पक्षाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी अनेकदा भूमिका घेतली होती. त्यामुळे ते वाद्यांच्या गोत्यात सापडले आहे. मात्र स्वामीं नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम असतात.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/