आमदार भालकेंनी पोलिसांच्या ताब्यातील दोन कार्यकर्त्यांना फिल्मी स्टाईलने पळविले

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन

मराठा आरक्षणाच्या बाबातीत राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुख्यंमंत्र्यांची शासकीय पुजा होऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २ कार्यकर्त्यांना आमदार भारत भालके यांनी अक्षरशः एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा फिल्मी स्टाईलने पळवून नेले आहे. हा संपूर्ण प्रकार १० ते १५ पोलीस हतबल होऊन पाहत राहिले आणि आमदार भालके पोलिसांच्या डोळ्यासमोरून  पसार झाले.

[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b480208-8cce-11e8-a966-0528b92bb9b3′]

यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. पंढरपुर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे आणि मराठा आरक्षण समितीचे रामभाऊ गायकवाड यांना इंदिरा गांधी व्यापार संकुल येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असल्याचे समजताच आपल्या कार्यालयात असलेले आमदार भारत भालके गाडी घेऊन इंदिरा गांधी चाैकात आले १० ते १५ पोलिसांच्या गराड्यातुन दोन्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढून गाडीत बसवून नेले.

यावेळी पोलिसांनी देखील आमदार भालके यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार भालके यांनी त्यांना न जुमानता दोन्ही कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत बसवून नेले.