महिला IPS वर भडकल्या काँग्रेसच्या MLA शकुंतला साहू, म्हणाल्या – ‘औकात दाखवते’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये काँग्रेस आमदार शकुंतला साहू आणि महिला आयपीएस अधिकारी यांच्यात होणाऱ्या वादासंदर्भातील व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ही घटना बलौदा बाजारातील सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये कसडोल च्या आमदार शकुंतला साहू प्रशिक्षणार्थी आयपीएस अंकिता शर्माला ‘औकात दाखवण्याची’ धमकी दिली आणि त्यांचे असे विधान व्हिडिओ मध्ये देखील स्पष्ट ऐकू येत आहे.

बुधवारी परिसरातील सिमेंट कारखान्यात एक अपघात झाला आणि या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटूंबासाठी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेसच्या आमदार शकुंतला साहू या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत धरणा देऊन बसल्या. दरम्यान काही वेळानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या आंदोलनाचे मोठ्या गोंधळात त्याचे रूपांतर झाले.

तिथे उपस्थित महिला आयपीएस अंकिता शर्मा ने आंदोलन करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु या दरम्यानच महिला आमदार त्यांच्यासोबत भिडल्या आणि त्यांना धमकी दिली की ‘नीट राहा, नाहीतर औकात दाखवीन.’ अशा शब्दात आमदारने आयपीएस महिलेला सुनावले.

यानंतर अंकिता शर्मा यांनीही आमदारांशी बोलताना म्हटले की ‘औकात बद्दल बोलू नका मॅडम.’ मात्र, गोंधळ माजण्यापूर्वीच प्रशासन आणि कंपनीसोबत चर्चा झाल्यानंतर पीडितेच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती.