गर्दीच्या ठिकाणी मोबाईलवर डल्ला मारणाऱ्याला अटक

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना हेरून  मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एक  च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. नागनाथ रामभाऊ सुतवणे (वय-38, रा. घर. नं. 29, दगडी चाळ फुरसुंगी, पावर हाऊस ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 1 लाख 9 हजार 500 रुपये किंमतीचे 24 मोबाईल हॅंन्डसेट जप्त करण्यात आले आहेत.

शहरामध्ये वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनामुळे गर्दीच्या ठिकाणी गस्ती घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी पोलीस हवालदार अशोक माने व त्यांचे सहकारी प्रकाश लोखंडे यांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फत एक इसम काळ्या रंगाची बॅग घेऊन उभा असून, तो रस्त्यावरु येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना कमी किंमतीत मोबाईल फोन विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B01MU7ZZJV,B0783HZ6LZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b196d6e0-8058-11e8-a247-13ba15c47a1c’]

स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरातून कोणाचे मोबाईल फोन चोरी केले असल्यास त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याशी संपर्क करुन आपले मोबाईल फोन घेऊन जावेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदिप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी अशोक माने, प्रकाश लोखंडे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने, मेहबूब मोकाशी, तुषार माळवदकर, राजू पवार, सचिन जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, रिजवान जिनेडी, तुषार खडके, इम्रान शेख, सुभाष पिंगळे, विजेसिंग वसावे यांनी केली.