आरोग्य सेतू अँप : मोदी सरकार देतंय 1 लाख रुपये जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी, फक्त तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आरोग्य सेतु अ‍ॅप देशात 15 दिवसांच्या आत 5 करोड आणि 40 दिवसात 10 करोड लोकांनी डाऊनलोड केले आहे. केंद्र सरकारनुसार कोवड-19 संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे देशभरात 3 हजार हॉट स्पॉटची माहिती मिळाली आहे.

दरम्यान या अ‍ॅपवर अनेक मोठ्या अ‍ॅथिकल हॅकर्सने अ‍ॅपच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामुळे केंद्राने अ‍ॅपच्या गोपनीयतेबाबात चिंता दूर करण्यासाठी याचा सोर्सकोड सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी आरोग्य सेतुच्या अँड्राईड व्हर्जनला ओपन सोर्स केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पत्रकार परिषदेत आरोग्य सेतु अ‍ॅपचे ओपन सोर्स करण्याची घोषणा केली. यासोबतच डेव्हलपर्स आता कोविड -19 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप इन्स्पेक्ट आणि मॉडिफाय करता येईल.

1 लाख रुपयांचे बक्षीस, सरकारने ओपन केला सोर्स कोड

सरकारने अ‍ॅपमध्ये बग शोधण्यासाठी बग बाऊंटी प्रोग्रामसुद्धा लॉन्च केला आहे, ज्यांअतर्गत आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये एखादा बग शोधल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. सरकारने सर्व डेव्हलपर्सचे स्वागत करत म्हटले की, अ‍ॅपबाबत काही प्रश्न असतील, काही कमी असेल किंवा काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत आहे.

नुकतेच फ्रेंच एथिकल हॅकर एलिअट एल्डर्सनने आरोग्य सेतुच्या सिक्युरिटीबाबत सरकारला चॅलेंज केले होते. हॅकरने अ‍ॅपवर रजिस्टर्ड 9 करोड लोकांच्या प्रायव्हसीला धोका असल्याचे म्हटले होते, तर राहुल गांधी यांनी सुद्धा या अ‍ॅपबाबत गंभीर प्रश्न उपस्थितीत केले होते, या प्रश्नांना सुद्धा हॅकरने योग्य म्हटले होते.

या प्रश्नानंतर सरकारने त्वरीत स्पष्ट केले की, अ‍ॅप यूजरची व्यक्तीगत माहिती लीक होणार नाही. कारण सतत सिस्टम अपग्रेड आणि टेस्टिंग परफॉर्म केली जात आहे.