शिरूर पोलिसांनी पकडलेली ती रक्कम ‘या’ बिल्डरची

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी निघोजकुंड येथे 1 कोटी 26 हजार रूपयांच्या 500 व 1000 च्या जुन्या नोटा सापडल्या असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आली. तर ही रक्कम बिल्डर परेश शिरोळे (रा.पिरंगुट) यांच्या मालकीची असल्यची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली आहे.

गणेश शिवाजी कोळेकर (25, रा. संविदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नरे (21) आणि अमोल देवराम दसगुडे (25, रा. कर्डिलवाडी, ता. शिरूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबतची माहिती अशी की दि.८ जून रोजी टाकळीहाजी निघोज कुंड परिसरात शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस हवालदार चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल हराळ हे रात्री १वाजुन २० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना कवठे येमाई तालुका शिरूर गावच्या हद्दीत हुंड्राई कंपनीची कार एम एच 14 EU 11 94 हि रोडच्या कडेला उभी असल्याचे आढळून आले.

त्यामुळे संशय आल्याने पोलीस वाहन उभे करून कारची तपासणी केली असता कारमध्ये वरील तीन आरोपी आढळून आले व ड्राइवर सीटच्या मध्ये बॅग सापडली त्यामध्ये जुन्या चलनी बंद पडलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या सुमारे १ कोटी सव्वीस हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्याने त्याबाबत चौकशी केली असता सदर आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

तर ही रक्कम बिल्डर परेश शिरोळे (रा.पिरंगुट) यांच्या मालकीची असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले. त्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे. याप्रकरणी income tax व ed यांचेही मार्गदर्शन घेतलेली आहे. शनिवार-रविवारची सुट्टी होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाकल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास शिरूर ते पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.

Loading...
You might also like