समाज सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी : अनंत गिते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

समाजात अनेक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रस्ट हे समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष हेतूने समाजाचे अंशत: ऋण फेडण्याचे काम ही माणसे करीत असतात. अशा समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e007c908-9ef6-11e8-aaf3-73215a9b0da7′]

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या बाजीराव रस्त्यावरील नातूबाग पटांगण येथे झालेल्या म्हसोबा उत्सवात भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, सारथीचे संचालक प्रशांत पवार, डॉ.सतिश देसाई, निर्मला केंढे, रुपाली पाटील-ठोंबरे, नीता परदेशी, बाळासाहेब अमराळे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, अशोक गावडे, महेंद्र कडू, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, उमंग शहा, सौरभ बेंद्रे, अश्विनी शहा आदी यावेळी उपस्थित होते.

संगीत क्षेत्रात राहुल रानडे, उद्योग क्षेत्रात माणिकचंद उद्योगसमुहाचे संचालक प्रकाश धारीवाल, धार्मिक क्षेत्रात रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अ‍ॅड. विजयराज दरेकर, व्यापार क्षेत्रात दाते मांडववालेचे संचालक दीपक दाते, पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांना भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमात माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. उपक्रमास वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांचे विशेष सहकार्य मिळाले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e92ddb5c-9ef6-11e8-bbe9-3fd9dfd928a7′]

अनंत गिते म्हणाले, अखिल म्हसोबा मंडई ट्रस्ट अनेक सांस्कृतिक, सामाजिक काम करीत आहे. भूषण पुरस्कार देखील समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना दिले जातात. समाजातील गुणीजनांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याचे काम ट्रस्ट नेहमीच करीत असल्याची बाब कौतुकास्पद आहे.