अमेरिकेतील यंदाची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक इतिहासातील सर्वात ‘महागडी’ ! खर्च पाहून अवा्क व्हाल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   यंदा अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक (United States Presidential election, 2020) होत आहे. इतिहासातील ही सर्वात महागडी निवडणूक असल्याचं बोललं जात आहे. गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत दुप्पट पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोध समूह द सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटीक्सनं (The Center for Responsive Politics) सांगितलं की, मतदानापूर्वीच्या महिन्यात राजकीय निधीत मोठी वाढ झाली आहे. या कारणामुळं या निवडणुकीत जी 11 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ती मागे पडली आहे.

एवढ निधी प्राप्त करणारे बायडन पहिले उमेदवार

शोध समूहानं सांगितलं की, 2020 च्या निवडणुकीत 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या निवडणुकीत खर्च केलेले सर्व रेकॉर्ड हे मागे पडले आहेत. समूहानुसार डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले उमेदवार आहेत ज्यांना दान देणाऱ्यांनी 1 अरब डॉलर एवढा निधी दिला आहे. ट्रम्प यांना 59.6 कोटी डॉलर मिळाले आहेत.

14 ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रचार मोहिमेला 93.8 कोटी डॉलर मिळाले आहेत ज्यात डेमोक्रेटीकचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांना हरवण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी दान देणाऱ्यांकडून 59.6 कोटी डॉलरचा निधी निवडणुकीच्या प्रचारासाठी जमा केला आहे.

महिलांनी तोडलं दान देण्याचं रेकॉर्ड

शोध समूहाचं असं म्हणणं आहे की, कोरोनाची महासाथ (Covid-19) असतानाही 2020 च्या निवडणुकीत रेकॉर्डतोड निधी दिला गेला आहे. यात उद्योगपतींसोबतच सर्वसामान्यांचांही समावेश आहे. समूहानं दिलेल्या माहितीनुसार, महिलांनी यंदा मोठ्या प्रमाणात दान दिलं आहे.

You might also like