ग्लॅमरस ‘माय-लेका’च्या जोडीनं वेधलं नेटकर्‍यांचं ‘लक्ष’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कपूर कुटुंबामध्ये लग्नाचा माहोल असून लवकरच अरमान जैन आणि अनिस्सा मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार आहे. अरमान हा राज कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करीना कपूर व करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ आहे. कपूर कुटुंबात मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाची धूम असताना सोशल मीडियावर फक्त चर्चा तैमुरचीच आहे कारण तैमुरच्या फोटोने नेहमीसारखे नेटकऱ्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमात तैमुरचा आणि आई करीनाचा एक फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी ‘इंडस्ट्रीतील सर्वांत ग्लॅमरस मायलेकाची जोडी’ अशा शब्दात वर्णन केले आहे.

यांच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर करीना पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आणि तैमुरने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. फोटोमध्ये तैमुरने ज्या अंदाजात पोज दिली आहे याला पाहून अनेक लोकांनी त्याला ‘भविष्यातील मॉडेल’ अशी कमेंट दिली आहे. एवढेच नव्हे तर इतकंच नव्हे तर ‘मान्यवर’च्या जाहिरातीत विराट कोहली आणि कार्तिक आर्यननंतर तैमुरच दिसणार, असंही एकाने मस्करीत म्हटलंय. करीना-तैमुरच्या या दोन फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत आहे.

अरमान जैन हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या तार वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. गेल्या वर्षा कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत अरमानचा साखरपुडा पार पडला. अरमानने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये फारसा कमाल करु शकला नाही. त्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण जोहरसोबत काम केले होते.