धक्कादायक ! बाळाचे ‘लिंग’ पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचे पोटच कापले

पोलिसनामा ऑनलाईन – गर्भवती पत्नीला मुलगा होईल की नाही हे तपासण्यासाठी पतीने पत्नीचे पोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील पाच मुलींच्या बापाने हे दृष्कृत्य केले आहे. त्यामुळे सध्या ही गर्भवती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पन्नालाल असे त्याचे नाव आहे.

बाळाचे लिंग पाहण्यासाठी पतीने पत्नीच पोट फाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचे पोट कापले. यानंतर महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण सिंह चौहान यांनी दिली. यानंतर महिलेला तातडीने बरेली रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. पन्नालालला याआधी त्याला 5 मुली आहे. त्याला मुलीची अपेक्षा होती. गर्भवती पत्नीच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचे पोट कापले. ही महिला 6 ते 7 महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे ठिकठिकाणी घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like