ICC World Cup 2019 : IND Vs ENG सामना वर्ल्ड कपमधील सर्वात ‘रोमहर्षक’ !

बर्मिंगहम : वृत्तसंस्था – सध्या सुरु असलेल्या विश्व कप स्पर्धेतील भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान राऊंड रॉबिन लीगमधील सर्वात मोठी लढत आज खेळली जाणार आहे. हा स्पर्धेतील सर्वात रोमहर्षक सामना ठरण्याची शक्यता आहे. कारण यजमान इंग्लंड स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत आहे तर भारतीय संघ शानदार क्रिकेट खेळत आहे. टीम इंडिया विश्वकप २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाप्रमाणे अपराजित राहत विश्वचॅम्पियन होण्याच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे वाटत आहे.

गेल्या लढतीत माजी विजेत्या विंडीजविरुद्ध भारताने छोट्या लक्ष्याचा बचाव करताना विजय नोंदवला. नक्कीच या विजयात भारतीय गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारतासाठी चिंतेचा विषय चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील फलंदाजी ठरला आहे. विजय शंकर सलग दोन सामन्यात (साधारण संघांविरुद्ध) मिळालेल्या संधींचा लाभ घेण्यात अपयशी ठरला. तीच स्थिती केदार जाधवची आहे. जाधवचा मजबूत पक्ष म्हणजे त्याने विश्वकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत संघाची स्थिती निराशाजनक असताना दोनदा शतके ठोकली होती.

आघाडीच्या फळीतील शिखर धवनसारख्या महत्त्वाच्या फलंदाजाला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतर त्याच्या स्थानी के. एल. राहुलला बढती देण्यात आली आहे. पहिल्या तीन विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतीय डाव गडगडण्याचा धोका आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तीनपैकी दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीला संयमी फलंदाजी करीत डाव सावरावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध संघात बदल न करता शंकर व जाधव यांना संघात कायम राखायला हवे आणि त्यानंतर बांगलादेश व श्रीलंका यांच्यासारख्या साधारण प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध नवे प्रयोग करता येईल.

इंग्लंडविरुद्ध छोट्या धावसंख्येचा बचाव करणे सोपे नाही. इंग्लंडची फलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना किमान ४० व्या षटकापर्यंत फलंदाजी करण्याच्या विचार करावा लागेल. या लढतीत इंग्लंड संघ चमकदार कामगिरी करण्याची कुठलीही संधी गमावणार नाही.

संघाच्या यशाची भिस्त फलंदाजीवर अवलंबून राहील. त्यांचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असतील. इंग्लंडचे तिन्ही पराभव लक्ष्याचा पाठलाग करताना झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या यजमानांचा ऑक्सिजन भारत काढून घेऊन स्पर्धेत अपराजित राहण्याचा मान मिळविणार का हे रविवारी रात्री स्पष्ट होणार आहे.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय

पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण