खळबळजनक ! आईने तोंड दाबून मुलावर केले चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – फोनवर जास्त बोलण्याची विचारणा केल्याच्या रागातून आईनेच झोपेत असलेल्या पोटच्या मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नेवासा तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

विशाल दीपक साळुंखे (वय १८) हे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी मुलाची आई शोभा दीपक साळुंखे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.१५) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी शोभा ही फोनवर बोलत होती. त्यावेळी विशालने किती वेळ फोनवर बोलतेस,’ अशी विचारणा केली. तेव्हा आई शोभा हिने ‘मी कीतीपण वेळ बोलेल. तुला काय करायचे’, अशी रागाने बोलली.

विशाल रात्री जेवण करून बाहेर अंगणात झोपलेला होता. पहाटेच्यावेळी आई शोभा हिने झोपेत असलेल्या विशाल याचे तोंड दाबले. त्याला काही कळायच्या आत आईने हातातील चाकूने कान व तोंडावर वार करू लागली. विशाल याने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातावरही वार केला. तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच, असे म्हणत आईने मुलावर चाकूचे वार केले. विशालने कशी तरी सुटका करून घेतली.

त्याने गळनिंब येथील आत्या संगिता दिगबंर शेळके यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर वैद्यकीय उपचार घेऊन नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like