अभिनेता ऋतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाची पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करत आहे. ऋतिक रोशनचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बंपर ओपनिंगचा अंदाज लावला जात होता. पहिल्याच दिवशी झालेल्या कमाईला पाहून असा अंदाज लावला जात आहे की, हा चित्रपट १०० कोटीचा आकडा पार करु शकतो. या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन एकदम वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या समोर आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टबद्दल बोलायचे म्हणले तर ऋतिक रोशनचा या चित्रपटाने पहिल्यादिवशी १२ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट ७० कोटी होते. ‘सुपर ३०’ चित्रपटाची कथा एका अशा शिक्षकावर आधारित आहे जे गरीब मुलांना आयआयटीचे प्रशिक्षण देत असताे. हा चित्रपट बिहारचे प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार याचा बायोपिक आहे. ज्यांना गणिताचे तज्ञ म्हणले जाते. या चित्रपटामध्ये दाखविले आहे की, आनंद कुमार आपल्या जीवनात खूप यशस्वी आहे. मेहनतीच्या बळावर त्यांना कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये दाखला ही मिळतो पण परिस्थिती त्यांचा पराभव करते. त्यामुळे ते कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात करतात.

ते आपल्या परिस्थितीला पाहून निर्णय घेतात की, जे त्यांच्यासोबत झाले ते इतर कोणासोबत होऊ नये म्हणून आनंद मजबूर मुलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कष्ट घेतात. त्यांना आयआयटीसाठी तयार करतात.

रिअल लाइफमध्ये आनंद यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर आनंद ज्या मुलांना शिक्षण देतात त्यातील ९०% मुले आयआयटीमध्ये सिलेक्ट होतात. ‘सुपर ३०’ चित्रपटामध्ये ऋतिक रोशन व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि मृणाल ठाकुल आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या