एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतानाही तिकीट कापलं : स्मिता वाघ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षात गेल्या ४० वर्षापासून निष्ठेने काम केलं. तरी एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतानाही आपलं तिकीट कापून चार वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे म्हणत भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर प्रतिक्रीया देतांना वाघ यांनी अशी नाराजी व्यक्त केली. तरीही आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करू असेही त्या म्हणाल्या.

आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी त्यांचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.

यावेळी स्मिता वाघ म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्षात आम्ही ४० वर्षांपासून निष्ठेने काम करत आहोत. पण, एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना आमचं तिकीट कापून चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. प्रामाणिकता आणि निष्ठा हा कदाचित माझ्या स्वभावातील दोष असेल. तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like