आतेभावाशी ‘अनैतिक’ संबंध, मदतीनं पतीचा खून ; ‘लिपस्टिक’मुळे ‘गूढ’ उकललं, तिच्यासह प्रियकर ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्या स्त्रीने येऊन घरात पतीची हत्या करुन चोरी केल्याचा बनावासाठी त्यांनी घरात पुरावा तयार केला. पतीच्या ओठाला व चहाच्या कपाला लिपस्टिक लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे पत्नी व तिच्या प्रियकराला गजाआड केले. दुसऱ्या स्त्रीवर या हत्येचा प्रकार ढकलण्यासाठी त्यांनी जो पुरावा तयार केला तोच त्यांच्या गळ्याचा फास बनला आहे.

प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. प्रमोद पाटणकर असे खुन झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी दिप्ती पाटणकर आणि प्रियकर समाधान पाषाणकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रमोदचा दिप्तीबरोबर विवाह झाला. परंतु दिप्तीचे २०१५ पासून आतेभाऊ समाधान पाषाणकर याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. दिप्ती आणि प्रमोद यांना एक मुलगी झाली. त्यानंतर प्रमोदला या प्रेमासंबंधाची माहिती मिळाली. त्यावरुन तो दिप्तीला त्रास देऊ लागला. त्यामुळे आपल्यातील काटा काढण्याचा कट दोघांनी रचला.

दिप्ती हिने १४ जुलै रोजी आपल्या लहान मुलीला आई वडिलांच्या घरी ठेवले होते. त्यानंतर १५ जुलैला सकाळी तिने प्रमोद याला चहा बनवून दिला. चहामध्ये तिने २० झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. चहा पिल्यानंतर प्रमोद झोपी गेला. त्यानंतर दिप्तीने समाधानला बोलावून घेतले. दोघांनी मिळून प्रमोदचा गळा आवळून त्याला मारले.

त्यानंतर प्रमोद दुसऱ्या स्त्रीबरोबर होता व तिने मारुन चोरी केली हे दर्शविण्यासाठी दिप्तीने चहा बनवला व ती निघून गेली. त्यानंतर समाधानने प्रमोदच्या ओठाला लिपस्टिक लावली. आणि ओठ चहाच्या कपाला लावले. तसेच बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. पोलिसांना याघटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळावरुन कप व अन्य साहित्य जप्त केले होते. प्रमोदच्या शवविच्छेदनात गळा आवळून मृत्यु असे कारण देण्यात आले. एखादी महिला प्रमोदचा गळा कसा आवळू शकते, असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर त्यांना दिप्तीचा संशय आला. त्यांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासल्यावर ती सातत्याने समाधानशी बोलत असल्याचे आढळून आले.

जप्त केलेल्या कप व लिपस्टिकवरील ठसे याची तपासणी केल्यावर त्यात समाधानचे ठसे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हे प्रेम प्रकरण समोर आले व त्यांनी प्रमोदची हत्या केल्याची कबुली दिली. खुनाचा प्रकार दुसऱ्यावर ढकण्यासाठी त्यांनी जो पुरावा तयार केला होता, तो पुरावा त्यांच्या गळ्याचा फास बनला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like