पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची हत्या

कोलकत्ता : वृत्तसंस्था 

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भाजप नेत्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी तृणमुल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

भाजपाचे नेता शक्तिपदा सरदार(वय  ४५) यांची शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपा नेत्यांनी या हत्येमागे तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी टीएमसीच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मात्र, टीएमसी कार्यकर्त्यांवर भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा हा पहिलाच आरोप नाही. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी जूनमध्ये पुरुलिया जिल्ह्यात एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या केवळ तीन दिवसांनंतर पुरुलियामध्येच आणखी एका भाजपा नेत्याची हत्या झाली होती.

[amazon_link asins=’B01HG4EC8S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67b8802a-92e9-11e8-9844-37a3d411b333′]

तसेच जून महिन्यात एका टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले होते. या प्रत्येक घटनेत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले होते.