बांगलादेशात महिला पत्रकाराची हत्या

ढाका : वृत्तसंस्था

बांगलादेशातील दूरचित्रवाणीवाहिनीच्या महिला पत्रकाराची भोसकून हत्या करण्यात आली आहे. सुवर्णा नोदी असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती ३२ वर्षांची होती. तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. ही महिला आनंदा टीव्हीसाठी काम करीत होती तसेच जाग्रोतो बांगला या वृत्तपत्राची प्रतिनिधी म्हणूनही ती कार्यरत होती.

[amazon_link asins=’9312147307,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e99caa43-ac11-11e8-a589-2306b0c10a77′]

बांगलादेशाच्या पबना जिल्हतील राधानगर भागात ती राहात होती. रात्री दहा ते बारा जण तिच्या घरी आले. त्यांनी बेल वाजवून त्यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले त्यानंतर त्यांनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर मारेकरी पळून गेले. स्थानिक नागरीकांनी तिला रूग्णालयात दाखल केले परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. हल्ल्याचा हेतू समजला नसून मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सर्वत्र पथके पाठवण्यात आली आहेत.