औंधमध्ये तलवारीने वार करुन तरुणाचा निर्घुण खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणाच्या कारणावरुन औंधमध्ये ५ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवाराने सपासप वार करुन त्यांचा खुन केला़ ही घटना मध्यरात्री औंधमधील डी पी रोडवर घडली.

लाल्या ऊर्फ रफीक शेख (वय २६) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेख व आरोपी यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाच्या कारणावरुन पाच जणांनी तलवारीने शेखवर वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात शेख पडल्यानंतर पाचही जण पळून गेले. लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. चतु:श्रृंगी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Visit : Policenama.com