परभणीतील मुस्लिम युवकाचे मुंडन करून मराठा मोर्चाला समर्थन

परभणी: पोलीसनामा ऑनलाईन 
मराठा क्रांती मोर्चाला राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. आज परभणी येथे मराठा क्रांती आंदोलनाच्या दरम्यान एका मुस्लिम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समितीच्या २४ सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.
[amazon_link asins=’B07B4THQHM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’248882a7-8f4d-11e8-825e-550288e197f9′]

पाथरी शहरात गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. पाथरीत वकील संघाने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर शेख मोईनोद्दीन या मुस्लिम युवकाने राष्ट्रीय महामार्गावर बसून भाजप सरकारचा निषेध करीत मुंडन करून घेतले आणि राज्यभरात चालू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला समर्थन दिले आहे.