म्हणून या प्राण्याला देणार ट्रम्प यांचे नाव 

लंडन : वृत्तसंस्था – पनामामध्ये नुकताच असा एक अनोखा उभयचर आढळून आला ज्याला ट्रम्प यांचे नाव देण्यात येणार आहे. या जीवाला डोळे आणि पायसुद्धा नाहीत. या जीवाला ‘डरमोफिस डोनाल्ड ट्रम्पी’, असे नाव देण्यात येणार आहे. जलवायू परिवर्तनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका पाहता त्या अनोख्या जीवाला ट्रम्प यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनच्या एनविरो बिल्ड या बांधकाम कंपनीने पाय, डोळे नसलेल्या या उभयचराला ट्रम्प यांचे नाव देण्याची नुकतीच घोषणा केली. मात्र, या निर्णयावर सविस्तर चर्चा होणे बाकी आहे. तरीही यापूर्वी अनेक अनोख्या जीवांना राष्ट्राध्यक्षांची नावे देण्यात आली आहेत.

हा एक अनोखा प्राणी आहे कारण याला पाय आणि डोळेदेखील नाहीत असे संशोधकांनी सांगितले आहे. या जीवाला ‘डरमोफिस डोनाल्ड ट्रम्पी’ हे नाव अगदी योग्य ठरते. हे नाव एनविरो बिल्ड कंपनीचे प्रमुख एडन बेल यांनी ठेवले आहे. या अनोख्या जीवाला नाव ठेवण्याचे अधिकार प्राप्‍त करण्यासाठी बेल यांनी 34 हजार 478 डॉलर्स खर्च केले आहेत.

हा अनोखा प्राणी आपले संरक्षण करण्यासाठी आपले डोके जमिनीखाली लपवतो.  डरमोफिस डोनाल्ड ट्रम्पीच्या शरीराची एकूण लांबी दहा सेंटिमीटर असून, त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे  त्याला डोळे आणि पाय नाहीत. विशेष म्हणजे हा जीव पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतो.