Pune News : पुण्याचं नाव जिजापूर ? प्रकाश आंबेडकरांचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पुण्याचे नाव जिजापूर करण्याबाबतच्या आपल्याच कथीत सूचनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. मी असे म्हटलोच नव्हतो तर संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे अशी मागणी केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील वातावरण तापल आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. असे असताना औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे देखील नामांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

याबाबत आंबेडकर यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी असे म्हणालोच नव्हतो. तर संभाजी महाराजांची दफनभूमी पुणे जिल्ह्यातील वडूज गावात असल्याने पुणे जिल्ह्याला जर कोणाचे नाव द्यायचे झाल्यास त्यांचे नाव योग्य राहील, असं मी म्हणालो होतो. हे सरकार टिकेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, भांडण झाली की काय होत हे आपणा सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे जी घरातील निती तीच राजकारणातील नीती, त्यामुळे नवीन काहीच नाही, असे सूचक विधान महाविकास आघाडी सरकार बद्दल त्यांनी केले.