Budget 2021 : देशात सर्वात जास्तवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड ‘या’ अर्थमंत्र्यांच्या नावावर

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारीला आर्थिक वर्ष 2021-22 चे बजेट सादर होणार आहे. हे मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील तिसरे बजेट असेल. अर्थमंत्री निर्मल सीतारामण हे बजेट सादर करतील. कोरोना माहामारी आणि त्यानंतर आर्थिक संकटामुळे यावेळचे बजेट अत्यंत महत्वपूर्ण झाले आहे. बजेटमध्ये पुढील आर्थिक वर्षात सरकारद्वारे करण्यात येणार्‍या खर्चासह अर्थव्यवस्थेला मजबूती देणार्‍या घोषणा आणि तरतुदी सुद्धा केल्या जातील.

सीतारामण तिसर्‍यांदा बजेट सादर करतील पण तुम्हाला माहिती आहे का, देशात सर्वात जास्त बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे? याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

भारतात सर्वात जास्त वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री मोरारजी देसाई आहेत. देसाई यांनी 10 वेळा बजेट सादर केले. यामध्ये 8 वार्षिक बजेट आणि दोन अंतरिम बजेट होते. देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळात पाच वार्षिक बजेट 1959-60 पासून 1963-64 आणखी एक 1962-63 चे अंतरिम बजेट सादर केले. अर्थमंत्रीपदाच्या आपल्या दुसर्‍या काळात देसाई यांनी 1967-68 ते 1969-70 चे वार्षिक बजेट आणि एक अंतरिम बजेट 1967-68 सादर केले होते.

मोरारजी रणछोडजी देसाई यांनी अर्थमंत्री पदाच्या आपल्या दुसर्‍या काळात 19 फेब्रुवारी 1968 ला एक असे बजेट सादर केले, ज्यामुळे देशाचे चित्र बदलले. या बजेटमध्ये त्यांनी इंडस्ट्रीसाठी सर्वात महत्वाचा निर्णय मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स म्हणजे फॅक्टरी गेटवर एक्साइज डिपार्टमेंटद्वारे असेसमेंट करणे आणि स्टँपची अनिवार्यता बंद केली.

कोणत्या अर्थमंत्र्यांनी किती बजेट सादर केले
मोरारजी देसाई – 10
पी. चिदंबरम – 09
प्रणब मुखर्जी – 08
यशवंत सिन्हा – 07
मनमोहन सिंह – 06
अरूण जेटली – 05
वाय. बी. चव्हाण – 07
सी. डी. देशमुख – 07