राष्ट्रपतीनियुक्त नव्या राज्यसभा सदस्यांची नावे जाहीर 

 नवी दिल्ली : वृत्तसंसथा 
२०१२ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि रेखासह १२ सदस्यांना राज्यसभेसाठी नामनियुक्ती  करण्यात आली होती. २४ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ एखाद-दोन वेळेस मैदानाबाहेर रहावं लागलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनला राजकारणाचं मैदान काही भावलेले दिसत नव्हते. राज्यसभा सदस्य झाल्यापासून गेल्या पाच वर्षात केवळ २३ वेळाच सचिनने संसदेत हजेरी लावली होती. तर अभिनेत्री रेखानेही अवघ्या १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली होती.
सचिनने २०१३ मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यामुळे तो संसदेच्या प्रत्येक कामकाजात भाग घेईल असे वाटत होते. पण पाच वर्षात सचिन केवळ २३ वेळाच संसदेत उपस्थित राहिला आहे. म्हणजेच पाच वर्षात झालेल्या ३४८ अधिवेशनांमध्ये केवळ २३ वेळाच त्याने संसदेच्या कामकाजात भाग घेतला आहे. तर अभिनेत्री रेखाने १८ वेळा.
[amazon_link asins=’B077PWB22Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca0fc037-873b-11e8-965d-d7968020b778′]
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला आहे. यांचा कार्यकाळ संपताच यांच्या जागेवर नवीन चार खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या १२ पैकी चार जागा रिक्त झाल्या असता त्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चार जणांची निवड केली आहे.
नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य :
1)राकेश सिन्हा-    हे मूळचे बिहारचे बेगुसराईचे असून त्यांचे शिक्षण पाटणा व रांची येथे झाले आहे. त्यांचे अनेक लेख जनसत्ता, हिंदुस्तान, दिनमान, रविवार, ऑर्गनायझर, पांचजन्य व अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असून इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद संचालक आहेत. टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू मांडलेली दिसून येते.
2)सोनल मानसिंह-   या शास्त्रीय नृत्यअभ्यासक नृत्यांगना असून भरतनाट्यम व ओडिसी नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या आई गुजरातमधील एक ख्यातनाम समाजसेविका होत्या तर आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यपाल होते. मानसिंह यांनी मणिपुरी नृत्यापासून आपल्या शिक्षणाची नागपूर येथून सुरुवात केली. त्यांनी संस्कृत भाषेतील प्रवीण व कोविद या पदव्या संपादन केल्या आहेत. 1962 साली त्यांनी नृत्यातील करिअरला सुरुवात केली. त्यांना पद्मभूषण, संगीत-नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ नृत्यसेवेबद्दल दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांच्यावर सोनल नावाचा माहितीपटही प्रसिद्ध केला आहे.
[amazon_link asins=’B07D8YJ6B9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7d1a198-873b-11e8-a1ca-654e7eb9fdaa’]
3)रघुनाथ महापात्रा-   रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि शिल्पविशारद आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकला क्षेत्र तसेच कलाशिक्षणामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
4)राम शकल-  राम शकल हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते माजी खासदार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज मतदारसंघातून तीनवेळा लोकसभेत निवडून आले होते.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4562079-873b-11e8-b143-27aa0bbf4281′]