गरजूंना वस्तूरूपी किंवा वैद्यकीय मदत असणार ! मी प्रतिष्ठानतर्फे नायगाव येथे गतिमंद मुलाला दिली व्हीलचेअर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजातील गतिमंद आणि दुर्बल घटकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांपर्यंत पोहोचून गरजवंतांना मदत करू शकतो. भविष्यात गरजूंना वस्तूरूपी आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचाररूपी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे मी मराठी प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्ष पूजा पाटील यांनी सांगितले.

नायगाव (ता. हवेली) येथे गतिमंद मुलाला व्हील-चेअर देण्यात आली. तसेच मी मराठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना पद देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे मी मराठी प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल धडके, हवेली तालुकाध्यक्ष आदेश इंगळे, प्रदेश सरचिटणीस नंदा जाधव, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अमृत पठारे, पुणे शहराध्यक्ष सुरेश वाळेकर, शिक्रापूर महिला अध्यक्षा कविता कडलग, ठाणे जिल्हाध्यक्ष सीमा धस, पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष सुनीता कदम, पुणे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब भोंडवे, कार्यकारिणी सदस्य प्रमोद जाधव, कैलास जगताप, नवनाथ चकोर, सूरज चकोर, सागर चकोर, जालिंदर इंगळे, श्रीकृष्ण पाटील उपस्थित होते.

अमृत पठारे म्हणाल्या की, सोशल मीडियावर मी मराठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून नायगाव येथील गतिमंद मुलाला व्हीलचेअरची गरज आहे. याची दखल घेत ग्रुपवरील कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून व्हीलचेअर खरेदी केली आणि त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. भविष्यात ग्रामीण भागासह शहरातील अशा गरजूंना मदत करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल यांनी सूत्रसंचालन केले.