मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
बॉलिवूड मध्ये ‘भाईजान’ म्हणून ओळख असलेल्या सलमानच्या संकटात अजून नव्याने वाढ झालेली आहे. एका अनिवासी भारतीय कुटुंबियाने सलमानवर मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.याबाबत त्याला पुन्हा कायदेशीर नोटीस मिळाली आहे. रेस-३ च्या यशानंतर सलमान अनेक प्रोजेक्ट कडे वळला आहे. पण सध्या तो पुन्हा अडचणीत आला आहे.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e8cc3ab-8010-11e8-b713-4d27ea9a4801′]
सलमानचा पनवेल जवळ एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊस लगत अनिता आणि केतन कक्कड यांची काही एकर जमीन आहे. ती जमीन त्यांनी १९९६ साली खरेदी केली होती .पण त्यानंतर काही कारणास्तव ते अमेरिकेला गेले होते. १८ वर्षानंतर भारतात परत आल्यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबाकडून आम्हाला त्रास होत आहे, असं त्यांनी तक्रारीत म्हंटल आहे.
कक्कड कुटुंबीयांनी घेतलेल्या जागेच्या जवळ सलमानचा फार्म हाऊस असून त्या फार्म हाऊस च्या गेट वर सलमान ने लोगो बसवला आहे त्यामुळे त्यांना घरामध्ये जाण्यासाठी अडचणी येत आहेत. ते म्हणालेत कि; आमच्या आजूबाजूच्या घरात वीज पुरवठा व्यवस्थित होत असून आमच्या घरात वीजपुरवठा व्यवस्थित होत नाही. असा दावा करत त्यांनी सलमानला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, कक्कड कुटुंबियांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे न्याय मागितला असून त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.
जाहिरात