नागरवस्ती योजना विभागामार्फत नवीन तीन विभाग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत महिला व बाल कल्याण, समाज कल्याण आणि इतर विविध कल्याणकारी योजनांची सक्षमपणे वेळेत अंमलबजावणी होत नाही.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e9e52ea-a835-11e8-a882-b71ce3300c9f’]

या विभागाचा कारभार अधिक सक्षमपणे होण्यासाठी महिला व बाल कल्याण, स्कील डेव्हल्पमेंट आणि दिव्यांग पेन्शन व इतर योजना असे तीन विभाग करण्यात येणार आहेत. सदर नव्या तीन विभागाच्या आकृतीबंधास शासनाचने मंजुरी दिल्यास त्यानुसार पदे भरली जाणार आहेत.

महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि नागरवस्ती योजना विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापौर जाधव म्हणाले, “पालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती तसेच, समाज कल्याण आणि इतर अशा विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचे अर्ज वाटप, छाननी, पात्र व अपात्र यादी आणि प्रत्यक्ष लाभ या संदर्भात नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले जाणार आहेत. हे वेळापत्रक 8 दिवसांमध्ये निश्‍चित करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.

विभागाचा कारभार अधिक सक्षमपणे होण्यासाठी महिला व बाल कल्याण, स्कील डेव्हल्पमेंट आणि दिव्यांग पेन्शन व इतर योजना असे तीन विभाग करण्यात येणार आहेत. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही येत्या महिन्याभरात केली जाणार आहे. त्यामुळे त्या-त्या विभागाची सक्षमपणे अंमलबजावणी होऊन अधिकाधिक नागरिकांना त्यांचा लाभ मिळू शकणार आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17960246-a835-11e8-8a76-3b617ede6a31′]

या विभागात निवृत्त अधिकारी व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटणार आहे. सदर नव्या तीन विभागाच्या आकृतीबंधास शासनाने मंजुरी दिल्यास त्यानुसार पदे भरली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.