नवनिर्वाचित ‘या’ खासदारावर झाला बलात्काराचा आरोप, तुरुंगात जाण्याची शक्यता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच एका नवनिर्वाचित खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. बलात्काराच्या आरोपावरून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या नवनिर्वाचित खासदाराला संसदेच्या ऐवजी तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील घोसी लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार अतुल राय यांच्यावर एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या संदर्भात संबंधित पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर अतुल राय फरार आहेत.

न्यायालयाकडे अतुल राय यांनी 23 मे पर्यंत दिलासा देण्याची विनंती केली होती. पण न्यायालयाने ती अमान्य केली. न्या.इंदिरा बॅनर्जी आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे प्रकरण रद्द करण्यासारखे नाही. तुम्ही निवडणूक देखील लढवली आहे आणि तुमच्यावर खटला देखील सुरु आहे. राय यांची याचिका रद्द केली असून याप्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, अतुल राय यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित तरुणी निवडणूक लढवण्यासाठी कार्यालयात निधी मागण्यासाठी येत असे. तसेच निवडणुकीच्या काळात ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एक लाख मतांनी जिंकली होती निवडणूक

उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघातून सपा-बसपाने फरार उमेदवार अतुल राय यांना उमेदवारी दिली होती. राय यांनी भाजपच्या हरिनारायण यांचा 1 लाख 22 हजार मतांनी पराभव केला. राय यांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले होते.