यड्राव हत्याकांड : नातवाच्या आनंदाच्या बातमीनंतर सुनेच्या खूनाची खबर

सांगली :पोलीसनामा ऑनलाईन

म्हैसाळ (ता. मिरज) येथील रावण कुटुंबाची सून सोनालीचा माहेरी यड्राव येथे खून झाल्याची बातमी समजताज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सोनालीसह तिच्या पाच महिन्याच्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच रावण कुटुंबावर काळाने घाला घातला. हत्याकांडाच्या घटनेनंतर पाच महिन्यांचे बाळ आईविना रहाणार असल्याने म्हैसाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da77fcfe-c985-11e8-8b24-77e8e03db5fe’]

म्हैसाळमधील अभिजित रावण याचा दीड वर्षांपूर्वी यड्रावमधील सोनालीशी विवाह झाला होता. विवाहानंतर नवेपण संपल्यानंतर रावण कुटुंबाला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदात होते. पाच महिन्यांपूर्वीच सोनालीने गोंडस बाळाला जन्म दिला होता. दोन दिवसांपूर्वीच अभिजित सोनालीसह बाळाला भेटण्यासाठी यड्रावला गेला होता. त्यावेळी त्याने रविवारी बाळासह तुला न्यायला येतो असेही सोनालीला सांगितले होते.

चार जणांचा खून करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रावण कुटुंबियही बाळासह बाळंतिणीच्या स्वागतासाठी उत्सुक होते. त्यांनी घराची डागडुजीही करून घेतली होती. रविवारी बाळ येणार असल्याने अभिजितचे आई-वडीलही आनंदात होते. मात्र शनिवारी सकाळीच सोनालीवर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समजली अन् रावण कुटुंबिय हादरून गेले. सर्व कुटुंबासह नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात धाव घेतली. तिथे उपचार सुरू असताना सोनालीचा मृत्यू झाल्याचे सजल्यानंतर अभिजितसह त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

[amazon_link asins=’B00NTCH52W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17463dd3-c986-11e8-95dd-2b996459927d’]