भाच्यानेच केला मामाचा खून, अवघ्या आठ तासात गुन्हा उघड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

ज्यूसची टपरी टाकून दिल्यानंतर वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या मामाचा भाच्यानेच कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गुन्हा उघडकीस आणत भुसावळ येथून आरोपी ताब्यात घेतले आहेत. सनाऊल हक सय्यद शेख (३२, सागर लांडगे चाळ, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b30a2a0-c4a4-11e8-956f-e72271d59698′]

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दशक्रिया जवळील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी भोसरी पोलीस दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना एका व्यक्तीचा खून झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाजवळील कागदपत्रांची पाहणी करून त्यानुसार संपर्क केला असता आलेल्या व्यक्तींनी मयताची ओळख पटवली.

पुणे / पिंपरी : भोसरीत युवकाचा खून : परिसरात खळबळ

मयत व्यक्तीचे भोसरीमध्ये भागीदारीत रस्त्यावर तीन ठिकाणी ज्यूसचे गाळे आहेत. रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघेजण त्यास बोलविण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी आले नाहीत. सकाळी त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसांनी तपास सुरू केला.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b296d559-c4a4-11e8-bcf1-a144d4703e94′]

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक पध्द्तीने तपास करत खून करून पळून जात असलेल्या चोघना भुसावळ, जळगाव येथून एका ट्रॅव्हल्स मधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील आरोपी आणि मयत यांचे मामा भाच्याचे नाते असल्याचे समोर आले. मयत मामा शेख यांनी भाच्याला टपरी घेऊन दिली होती. याचे भाडे द्यावे यासाठी मामा तगादा लावत होता. त्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याचे समोर येत आहे. तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like