वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 

स्टॉकहोम : वृत्तसंस्था 

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. ह्या वर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी. अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला  आहे. कॅन्सररोगाशी संबंधित संशोधनासाठीत्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b59626f-c570-11e8-8b73-fd7b5bab8d43′]

जेम्स पी अलीसन यांनी प्रोटीनचा अभ्यास करुन रोगप्रतिकार प्रणालीबाबत महत्त्वाचं संशोधन केलं. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे, ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कॅन्सर ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं. कॅन्सर थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला.

[amazon_link asins=’B01HQ4O058,B017WDVV3M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a148ec6a-c570-11e8-aebc-0fbe6cdaeb67′]

सर आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी ही पारितोषिकेपदार्थविज्ञान,  रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य तसेच अर्थशास्त्र आणि शांतीसाठी केलेल्या अतुलनीय कार्यासाठी प्रदान केली जातात . यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. गेल्या ७० वर्षात यंदा पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.
तनुश्रीचे ‘ते’ विधान म्हणजे बिग बॉस मध्ये एंट्रीचा स्टंटयंदा साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार नसल्याने सर्वांचं लक्ष शांततेच्या नोबेल पुरस्कारावर आहे. हा पुरस्कार शुक्रवारी ओस्लो इथं जाहीर होईल. मात्र त्यापूर्वी विज्ञानाशी संबंधित पुरस्कारांची घोषणा होईल.

जाहिरात.