Covid-19 In India : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 85 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात 45674 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. सणांचा कालावधी जवळ आला असताना देशाची राजधानी दिल्लीत स्थिती जास्त खराब दिसत आहे. देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 85 लाखांच्या पुढे पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सकाळी जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात कोविड-19 संसर्गाच्या 45 हजार 674 नव्या केस समोर आल्या आहेत, तर 559 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या केस समोर आल्यानंतर देशात आतापर्यंतची कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 85,07,754 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 78,68,968 लोक रिकव्हर झाले आहेत, तर देशात सध्या 5 लाख 12 हजार 665 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर एकुण मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 26 हजार 121 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 11,94,487 कोरोना तपासण्या करण्यात आल्या.

दिल्लीत शनिवारी कोविड-19 ची 6,953 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर संक्रमितांची संख्या वाढून 4,30,784 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, या महामारीमुळे आणखी 79 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानुसार सध्या 40,258 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

महाराष्ट्रात 3,959 नव्या केस
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 3,959 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर राज्यात संक्रमितांची एकुण संख्या वाढून 17,14,273 झाली. आरोग्य विभागानुसार, राज्यात संसर्गाने 150 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यात कोविड-19 ने मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या वाढून 45,115 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, राज्यात यशस्वी उपचारानंतर 6,748 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे राज्यात बरे होणार्‍या रूग्णांची एकुण संख्या वाढून 15,69,090 झाली आहे.