COVID-19 In India : देशातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 80 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात 45882 नवे पॉझिटिव्ह तर 584 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे, परंतु बर्‍याच राज्यांत कोरोनाच्या वाढत्या घटनांनी असे संकेत दिले आहेl की, येणारा काळ हा आणखी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,882 नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 संसर्गामुळे 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन केसेस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 लाख 4 हजार 365 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत, 84,28,409 लोक रिकव्हर झाले आहे, तर देशात सध्या 4 लाख 43 हजार 794 सक्रिय घटना आहेत. गेल्या 24 तासांत झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या 1 लाख 32 हजार 162 झाली आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात देशात 10,83,397 कोरोना तपासणी झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशाची राजधानी दिल्ली सध्या दिसत आहे.

कोविड 19च्या गुरुवारी दिल्लीत 7546 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 5.1 लाखांहून अधिक झाली आहे, तर 98 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 8041 वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत एकूण 62,437 तपास करण्यात आले होते, त्यामध्ये आरटी-पीसीआरच्या 22,067 तपासांचा समावेश आहे. दिल्लीतील सण-उत्सव आणि वाढते प्रदूषण यांच्यातील संसर्ग दर 12.09 टक्के आहे. राज्यात आता संक्रमित लोकांची संख्या 5,10,630 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 5,535 नवीन प्रकरणे, 154 मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 5,535 नवीन घटना घडल्यानंतर गुरुवारी संक्रमित लोकांची संख्या 17,63,055 वर पोहोचली. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, संक्रमणामुळे 154 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर मृतांची संख्या, 46,356 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनापासून बरे झालेल्या 5,860 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण रुग्णांची संख्या 16,35,971 पर्यंत वाढली आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे 1,340 नवीन रुग्ण आढळले
गेल्या 24 तासांत गुजरातमध्ये कोरोना विषाणूची 1,340 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यात संक्रमित होणाऱ्यांची संख्या 1,92,982 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात 1,113 रुग्णही संसर्गमुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3,830 वर पोहाेचली आहे. 1,113 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 1,76,475 रुग्ण निरोगी झाले आहेत.

बंगालमध्ये कोरोनामुळे आणखी 53 रुग्णांचा मृत्यू
गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणखी 53 रुग्णांचा मृत्यू झाला आणि राज्यात आतापर्यंत मृतांची संख्या 7,873 वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील विविध भागांतून 3,620 नवीन संसर्ग झाल्याची घटना समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या 4,45,505 वर पोहोचली आहे. बुधवारपासून या आजारातून 3,990 रुग्ण बरे झाले आहेत आणि निरोगी लोकांची संख्या 4,11,759 झाली आहे. राज्यात रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण 92.43 टक्के आहे.

जगभरात 24 तासांत 6.40 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे
जगात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढत आहेत. कोरोना आतापर्यंत जगातील 218 देशांमध्ये पोहोचला आहे. दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या 6 लाखांहून अधिक आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 लाख 40 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत, तर या कालावधीत 10,680 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, जगात आतापर्यंत 5 कोटी 72 लाख 12 हजार कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 13 लाख 64 हजार लोक मरण पावले आहेत.