Covid-19 In India : देशातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 95 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात आढळले 35551 नवे पॉझिटिव्ह तर 526 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत असली तरी सध्या हे म्हणता येणार नाही, कोरोना महामारीचे संकट पूर्णपणे दूर झाले आहे. मागील 24 तासात कोरोनाची नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 95 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार मागील 24 तासात कोविड-19 संसर्गाची 35,551 नवी प्रकरणे समोर आली, तर 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवी केस समोर आल्यानंतर देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 95 लाख 34 हजार 964 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 89 लाख 73 हजार 373 लोक रिकव्हर झाले आहेत, तर देशात सध्या 4 लाख 22 हजार 943 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूनंतर देशातील मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 38 हजार 648 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 11 लाख 11 हजार 698 कोरोना तपासण्या करण्यात आल्या.

राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे थोडी कमी झाली आहेत, परंतु अगोदरच्या तुलनेत अजूनही कोरोना रुग्णांची संख्या भीती दाखवत आहे. दिल्लीत बुधवारी कोरोनाच्या 3944 नव्या केस समोर आल्या, तर 82 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत 5 लाख 78 हजार 324 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत, तर 9342 लोकांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांतील कोरोना आकडेवारी

मध्य प्रदेश
1439 नवीन केस
17 मृत्यू

गुजरात
14 आणखी मृत्यू
1512 नवीन रुग्ण

राजस्थान
1990 नवीन रुग्ण
19 मृत्यू