Coronavirus : गेल्या 21 दिवसात ‘कोरोना’चे 10 लाख नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 20 लाखाच्या पुढं तर भारत जगात तिसर्‍या स्थानावर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. मागील 24 तासात विक्रमी 62 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आल्याने देशात आता एकुण रूग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. भारत गुरूवारी अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगातील तिसरा देश बनला, जेथे 2 मिलियन म्हणजे 20 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह केस नोंदल्या गेल्या आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या यासाठी जास्त भितीदायक आहे, कारण यातील 10 लाख नव्या केस अवघ्या 21 दिवसात समोर आल्या आहेत. यापूर्वी 16 जुलैरोजी 10 लाख कोरोना संक्रमित संपूर्ण देशात होते.

मागील 24 तासात देशात 62,538 प्रकरणे समोर आली आहेत. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात एकुण कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 20 लाख 27 हजार 074 झाली आहे. देशात आतापर्यंत 41 हजार 585 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात आता आपण अमेरिका आणि ब्राझीलच्या पाठीमागे आहोत. अमेरिकेत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 50,32,179 आहे, तर 1 लाख 62 हजार 804 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारे ब्राझीलमध्ये कोरोनाच्या आतापर्यंत 29 लाख 17 हजार 562 नव्या केस समोर आल्या आहेत, तर 98 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतानंतर रशियाचा नंबर नंबर आहे. रशियामध्ये 8 लाख 71 हजार 894 कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. तर 14 हजार 606 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दक्षिण अफ्रीकेत रूग्णांची संख्या 5 लाख 38 हजार 184 आहे, आणि 9 हजार 604 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाच्या केस दुप्पट होण्याचा दर 22.7 दिवस आहे, तर अमेरिकेत तो 60.2 आणि ब्राझीलमध्ये 35.7 दिवस आहे. भारतात ज्याप्रकारे कोरोनाचा वेग वाढत आहे, तो चिंताजनक आहे. भारतात अ‍ॅक्टिव्ह केस 6 लाख 7 हजार 384 आहेत, तर अमेरिकेत अ‍ॅक्टिव्ह केस 22 लाख 92 हजार 707 आहेत, तर ब्राझीलमध्ये 7 लाख 71 हजार 258 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.