COVID-19 : मोठा दिलासा ! भारतात ‘कोरोना’च्या संक्रमणातून 4 लाखाहून जास्त रूग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 60.77 %

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज कोरोनाची सर्वाधिक 24,850 प्रकरणे नोंदविली गेली आहे. यासह एकूण प्रकरणाची संख्या वाढून 6,73,165 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत साथीच्या आजारामुळे 613 जणांचा मृत्य झाल्याने रविवारी मृतांची संख्या 19,268 झाली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 20 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजता प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4,09,082 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

तर एक रुग्ण देश सोडून गेला आहे. सध्या देशात 2,44,814 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 60.77 टक्के आहे.”