नर्सेस कर्मचारी सेवाभावी संस्था सोलापूरतर्फे ‘परिचारिकां’चा पुरस्कार देऊन ‘सन्मान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – परिचारिका (नर्सेस) कर्मचारी सेवाभावी संस्था, सोलापूरतर्फे प्लोरेन्स नाईंटीगेल राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. गौवर परिरचारिकांचा आणि त्यांच्या कार्याचा हा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एकूण 150 परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारात एकूण 7 पुरस्कार असे होते जे विशेष पुरस्कार होते. याशिवाय बेस्ट स्टुडंट ऑफ द ईयर(नर्सिंग) हा पुरस्कारही देण्यात आला. मंगळवारी (दि 4 फेब्रुवारी 2020) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

 

शोभा घनवट (ससून हॉस्पिटल) यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. दीपक म्हस्के, शिल्पा टिळेकर, तेजस्विनी, शशिकला लोमटे, प्रीतम देशमुख, सोनी हंगे, इलियास शेख, पूजा मंडे, किरण होळकर, मनीषा गवळी, सोमनाथ तांदळे, रुपाली कसबे, स्वप्नील बोऱ्हाडे, शुभांगी बोंदाडे, सुधा मंगरूळकर आदींना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमावेळी सचिन सावंत, (असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस पुणे), डॉ अर्चना पाटील (रेडिओलॉजिस्ट नोबेल हॉस्पिटल हडपसर पुणे), डॉ नेहा रोडा (कंसल्टंट फिजिओथेरपिस्ट- सोलापूर) आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याशिवाय प्रदीप गायकवाड (नगरसेवक पुणे मनपा), ज्योतीराम माळी, महावीर तळेकर, विजया पाटील(बांधकाम विभाग सोलापूर), जीबीन टी सी (यु एन ए प्रदेशाध्यक्ष) आदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विशेष सत्कारमुर्ती कुनल वाघमारे (न्यायाधीश) हेदेखील उपस्थित होते.

डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी (चेअरमन- सोलापूर केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर) हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सुशीला गायकवाड मुख्य संयोजिका होत्या. आशितोष नाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शुभांगी इंगळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रासंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.